शहापूर मधील पुरातन मुरलीधर राधाकृष्ण मंदिरात गोकुळ अष्टमी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.हे मंदिर सव्वा दोनशे वर्षापूर्वीचे असून मंदिरात चतुर्भुज श्री कृष्णाची मूर्ती आहे.गोकुळ अष्टमी निमित्त संपूर्ण मंदिराची डोळे दिपवणारी सजावट करण्यात आली होती.अष्टमी निमित्त मंदिरात सकाळी पूजा,अभिषेक करण्यात आली.
रात्री जन्मोत्सव साजरा करण्यात आला.त्या नंतर प्रसाद वितरण करण्यात आले. मंत्रपुष्प,कीर्तन ,गायनाचा कार्यक्रम देखील मंदिरात आयोजित करण्यात आला होता.संपूर्ण मंदिरात मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर करण्यात आला असून त्यावर उत्कृष्ट नक्षीकाम करण्यात आलेले आहे.मंदिराचे मालक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहित बोंद्रे यांनी अष्टमी निमित्त विविध धार्मिक विधी केले.संपूर्ण दिवसभर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.