बेळगाव जिल्ह्यातील गोकाक धबधबा काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून धबधबा पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे.
घटप्रभा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धबधबा प्रवाहित झाला आहे.धबधब्याची उंची बावन्न मीटर इतकी आहे.घटप्रभा नदीला पाणी आल्यावर पाण्याचा प्रवाह खाली कोसळताना पाण्याचे तुषार उडतात ते एक किलोमीटर अंतरापर्यंत उडतात.धबधब्याच्या जवळ असणारा झुलता पूल देखील पर्यटकांचे आकर्षण आहे.दोनशे मीटर लांबीच्या या झुलता पुलावरून चालताना एक वेगळा आनंद पर्यटकांना मिळतो. धबधब्याच्या ठिकाणी विद्युत निर्मिती केंद्र असून भारतातील ते पाहिले विद्युत निर्मिती केंद्र म्हणून ओळखले जाते.१८८७ साली हे विद्युत निर्मिती केंद्र सुरू करण्यात आले आहे.हा धबधबा बेळगाव पासून सत्तर किलोमिटर अंतरावर असून तेथे जाण्यासाठी बेळगाव येथून बस आणि रेल्वेची सुविधा आहे.
D Media 24 > Local News > *गोकाक धबधबा मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने प्रवाहित*
*गोकाक धबधबा मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने प्रवाहित*
Deepak Sutar04/07/2024
posted on
Leave a reply