एस के ई सोसाइटीच्या वतीने बारावी वार्षिक परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्याचा गौरव
एस के ई सोसाइटीच्या विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेच्या बारावी वार्षिक परीक्षेत विशेष गुणवत्ता घेऊन
उतीर्ण विद्यार्थी वर्गाचा गौरव कार्यक्रमाचे आयोजन श्री आर के देसाई सभागृहात करण्यात आले.
या वर्षीच्या बारावी वार्षिक परिक्षेत कला विभागतून राज्यात दहावा क्रमांक एका विद्यार्थीनीने प्राप्त केला तर कला आणि विज्ञान शाखेतून दोन विद्यार्थ्यानी जिल्हा स्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त केला, तसेच उत्कृष्ट अंक प्राप्त ईतर विद्यार्थी वर्गाचा गौरव करण्यात आला.
या सन्मान कार्यक्रमास एस के ई सोसाइटीचे व्हाईस प्रेसीडेंट श्री अशोक शानभाग, श्रीमती लता कित्तुर,प्राचार्य एस एन देसाई आणि प्राचार्या श्रीमती सुजाता बिजापूरे,व्यासपीठावर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर,विद्यार्थी, पालक वर्ग आणि प्राध्यापक यांचे स्वागत प्राचार्य एस एन देसाई यांनी केले,
कला विभाग तून राज्यात दहावा क्रमांक प्राप्त केलेली विद्यार्थीनी कुमारी महालक्ष्मी कुसगुर, कुमारी शाश्वती कळ्ळीमनी, कुमार साहिल चव्हाण,
विज्ञान शाखेतून बेळगाव जिल्हात प्रथम क्रमांक प्राप्त कुमारी सृष्टी दीगाई,कुमारी अंकितासारिका कानशिडे,कुमार तन्मय कुरूदंवाड,
वाणीज्य शाखेतून कुमारी रेणुका दिंडे,कुमारी रिया वरमेलर,कुमार यश करोळे आणि इतर विद्यार्थी वर्गाचा गौरव संस्थेचे उपाध्यक्ष श्री अशोक शानभाग आणि श्रीमती लता कित्तुर ,श्रीमती बिंबा नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डाॅ किर्ती फडके समुहाने केले, आभार प्रदर्शन प्रा डाॅ किर्ती फडके यांनी केले.