पंचमचाली समाजाला 2 ए आरक्षण द्या: अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार
पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून आम्ही संघर्ष, आंदोलन करत आहोत. पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण देणार असल्याचे सांगून अनेकवेळा सरकारने नाकाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे .त्यामुळे उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण देऊन गोड बातमी न दिल्यास विधानसभा निवडणुकीत धडा शिकविला जाईल, असा इशारा पंचमसाली समाज जिल्हा युवा संघाचे अध्यक्ष राजशेखर के. पाटील यांनी दिला आहे .
पुढे ते म्हणाले कि बंगळुरच्या फ्रीडम पार्कमध्ये पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण देण्याच्या मागणीसाठी कुडलसंगम स्वामीजी 69 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. पण सरकारने त्यांची दखल घेतलेली नाही असे सांगितले .
तसेच 24 मार्च रोजी विधानसौध, बंगळुरू येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात यावा, अन्यथा स्वामीजींनी घेतलेल्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत, असे ते सांगितले .
सदर पत्रकार परिषद शहरातील एका खासगी हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उत्तर मतदारसंघात राष्ट्रीय पक्षांनी पंचमसाली समाजाच्या नेत्यांना तिकीट द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.