युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
सततच्या आजाराला कंटाळून राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन एका युवतीने आत्महत्या केली आहे रोहिणी चोपडे वय 23 असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून ती खानापूर शहर येथे शिवाजीनगर जवळील रहिवासी आहे.
घरात कोणी नसल्याचे पाहून सदर युवतीने आत्महत्या केली यावेळी तिची आई शेताला गेली होती तर भाऊ कामावर गेला होता. घरात कोणी नसल्याचे पाहून तिने आत्महत्या केली.
जेव्हा रोहिणीचा भाऊ कामावरून घरी आला तेव्हा रोहिणीचा मृतदेह त्याने पाहिला यावेळी त्याने लागलीच खानापूर पोलिसांना या घटनेची नोंद केली. यावेळी शवविच्छेदन करून झाल्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
रोहिणी ही एका मेडिकल शॉप मध्ये काम करत होती तसेच तिच्या आत्महत्येच्या बातमीने खानापूर मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून पोलीस अधिक तपास करत आहे.