आम्हाला न्याय मिळवून द्या यांनी केली मागणी
2004 साली मूळ मालकाने जवळपास 18 ते 19 वर्षे झाली तरी ते आमच्या नावावर केले नाही तसेच आता सध्याच्या रेटने तुम्ही नव्याने घर घ्या असे घर मालक सांगत आहेत. मात्र आम्ही 2004 साली तीन लाख 70 हजार रुपयांना घर विकत घेतले. आणि घरावर असलेले सर्व कर्ज फेडून टाकले मात्र आता घर मालक आम्हाला त्रास देत आहेत तसेच जातीवरून आमच्यावर शिवीगाळ आणि मारहाण करत आहेत त्यामुळे आम्हाला आणि आमच्या कुटुंबीयांना न्याय द्या अशी मागणी अनिता कांबळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांसमोर केली.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांनी एका आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्या म्हणाल्या की 2004 मध्ये ग्रामपंचायत मध्ये एसटी मिळाकट्टा क्रमांक 629 घर क्रमांक आम्ही अंजली अतुल केसरकर यांच्याकडून तीन लाख 70 हजार रुपयांना विकत घेतले होते. तसेच सर्व घरावरील कर्ज फेडून खरेदी व्यवहार पूर्ण करण्याचे निर्णय घेतला मात्र आता बँकेचे कर्ज भरले तेव्हा बँकांच्या अधिकाऱ्यांनी अंजली अतुल केसरकर आल्या तरच आम्ही एनओसी देऊ असे सांगितले. त्यामुळे सर्व व्यवहार इतर व्हावे याकरिता आम्ही मूळ मालकांच्या घरी गेलो यावेळी त्यांच्या पत्नीने घरात कोणी नाही अशा प्रकाराची उडवा उडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर न्यायालयाद्वारे आम्हाला घरा संदर्भात नोटीस बजाविण्यात आली पंधरा दिवसात घर खाली करा अशा प्रकाराची ही नोटीस होती. त्यानंतर थोड्या दिवसांनी अरुण लाड हे आमच्या घरात आले आणि त्यांनी आमच्या सर्व कुटुंबीयांना तुम्ही घर घेण्यास योग्य नाही आमचं घर रिकामे करा असे म्हणून माझ्या पत्नीवर तसेच मुलींना देखील मारले.
त्यानंतर जातिवाचक शिवीगाळ आमच्यावर केली आम्ही यासंदर्भात ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल केली आहे मात्र आम्हाला अजून पर्यंत न्याय मिळाला नाही तसेच आरोपींनी अटकपूर्वक जामीन अर्ज केला आहे.
तसेच अरुण सिद्राय लाड हे घराच्या समोरून जाताना आमच्यावर ओरडत आहे तसेच घरावर थुंकत आहेत आम्हाला गावात सर्वजण ओढत आहेत मला तीन मुली आहेत त्यामुळे आम्हाला संरक्षण हवे आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला न्याय हवा आहे अशी मागणी कांबळे कुटुंबीयांनी यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.