प्रादेशिक सेनेतर्फे बेळगावच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल मैदानावर सुरू असलेल्या सैन्य भरती मेळाव्यात रविवारी भरतीच्या ठिकाणी युवक हजारोंच्या संख्येने दाखल झाल्यामुळे त्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी सौम्य लाठीमार करावा लागला.
बेळगांव :येथील प्रादेशिक सेना मुख्यालयाच्यावतीने भरती प्रक्रिया राबविली जात आहे. प्रादेशिक सेनेच्या 106 पॅरा, 115 महार व 125 दि गार्ड्स इन्फंट्री बटालियनमधील जनरल ड्यूटी (जीडी) 257 आणि क्लार्कच्या 53 जागांसाठी सदर भरती सुरू आहे.
बेळगावच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल मैदानावर सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये कर्नाटकसह तेलंगणा, गुजरात, गोवा, दादरा, नगर हवेली, पांडेचेरी, दिव, दमण, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांमधील युवकांना टप्प्याटप्प्याने सहभागी करून घेतले जात आहे.रविवारी
मिलिटरी स्कूल मैदान परिसरात हजारोच्या संख्येने तरुण भरतीसाठी आले होते. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी नाईलाजाने सौम्य लाठीमार पोलीस आणि प्रादेशिक सेनेच्या जवानांनी केला.