कर्नाटक राज्य समगार हरळय्या संघाच्या बेळगाव जिल्हाध्यक्षपदी गणेश काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. श्री शिवशरण हरळय्या समगार समाज युवक संघाच्या सामुदायिक भवन, काकती वेस गल्लीत मंगळवारी पार पडलेल्या बेळगाव जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत गणेश काळे यांची बिनविरोध निवड झाली.https://dmedia24.com/inauguration-of-summer-camp-on-behalf-of-the-cantonment-board/
या महत्त्वपूर्ण निवडणुकीसाठी राज्याध्यक्ष जगदीश बेटगेरी, उपाध्यक्ष परशुराम अरिकेरी आणि मञ्जुनाथ हंजगी हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी गणेश काळे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर, नव्या जिल्हाध्यक्षांचा सन्मान समारंभ आयोजित करून त्यांचा गौरव करण्यात आला.
“समाजाचा विकास हेच माझे प्रमुख ध्येय आहे. समाजाला शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी मी अखंड प्रयत्न करीन,” असे नूतन जिल्हाध्यक्ष गणेश काळे यावेळी बोलताना म्हणाले.
या प्रसंगी समाजातील अनेक ज्येष्ठ आणि प्रमुख नेते भीमराव पवार, शंकरप्पा बेलगळी, लक्ष्मण काळे, रवी शिंदे, किशोर पवार, लक्ष्मण माचकनूर, संतोष होंगल, परशुराम तोरे, हिरालाल चव्हाण,शिवराज सौदागर, आनंद तोरे, राजेंद्र बीडकर, किरण मुरगोड,देवेंद्र कांबळे, सचिन माने, रवी होंगल, शंकर कांबळे, संजय चौगुले, सुभाष कट्टीमनी, अर्जुन रायबाग, बसवराज कित्तूर, तिप्पण्णा सौदत्ती, आणि महिला प्रतिनिधी श्रीदेवी कांबळे, वीणा चिकोडे, अनिता काळे उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी नव्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली समाजाच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
संघाच्या अनेक सदस्यांनी या सोहळ्यात भाग घेतला आणि गणेश काळे यांच्या नेतृत्वाखाली संघाने अधिकाधिक प्रगती करावी, अशी इच्छा व्यक्त केली…