वडगांव अल-मदद कमिटी तर्फे गणराजोत्सव साजरा
बेळगाव: वडगांव तसेच बेळगांव मधील गोर-गरीब आणि गरजू लोकांना रेशन पुरविणे, कपडे, औषधे, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याच्या उद्देशाने स्थापित करण्यात आलेली वडगांव निजामिया अल-मदद कमिटी आणि वेलफेर ट्रस्ट तर्फे भारतीय गणराजोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला समाजसेवक फैयाज सौदागर हे प्रमुख अतिथी पदी उपस्थित होते. तर विशेष आमंत्रिक म्हणून मराठा मंडळ पदवी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.डी.एम.मुल्ला हे उपस्थित होते.अध्यक्षस्थान कमिटीचे अध्यक्ष इब्राहिम हुक्केरी यांनी भूषवले होते.
प्रमुख अतिथी समाजसेवक फैयाज सौदागर यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आला. राष्ट्रगीता नंतर प्रमुख अतिथी फैयाज सौदागर म्हणाले की भारतीय संविधानामुळे आज देशात अनेक जाती, धर्म,भाषा, पोशाखा मध्ये विविधता असून सुद्धा आम्ही सर्व एक आहोत. भारतीय संविधानाला मानून त्याच्यानुसार जीवन जगने प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे.यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि वडगांवच्या लोकांना गणराजोत्सवाच्या निमित्ताने मिठाई पदार्थाचे वाटप करण्यात आले.
या समारंभाला वडगांव निजामिया जामिया सुन्नत जमातचे अध्यक्ष सलीम सय्यद,अल-मदद कमिटीचे मुजफ्फर नदाफ,आरिफ मुरगोड, रईस देसाई, इमामहुसेन धारवाडकर,वाहिद सनदी, इरफान जमादार, अशपाक मदरंगी,समीउल्ला सौदागर,मलीक बिजापूरे,सलीम माणगांवकर आदि सदस्य,विद्यार्थि आणि वडगांव मधील नागरीक उपस्थित होते.