सासनकाठी पोहोचली गाईमुखावर
चैत्रपौर्णिमेनिमित्त वाडी रत्नागिरी डोंगर येथे गेलेल्या बैल गाड्या सासनकाठी आणि भक्त आज कामदा एकादशीनिमित्त गाईमुखावर पोचले आहेत.
चव्हाट गल्ली श्री ज्योतिर्लिंग देवस्थान देवघर येथून सोमवार दिनांक 27 रोजी बैलगाडी व पायी दिंडी भाविक यात्रेकरिता प्रवास सुरू झाला. त्यानंतर 5 दिवसांचा पायी प्रवास करत सर्वजण गायमुखाकडे मुक्काम केले आहे.
बैलगाड्या सासन काठी आणि ज्योतिबा फक्त मंडळी 27 मार्च रोजी बेळगाववरून डोंगराकडे मार्गस्थ झाल्यावर दिनांक
28 रोजी संकेश्वर 29 रोजी सौंदलगा 30 रोजी गोकुळ शिरगाव 31 रोजी पंचगंगा असे मुक्काम करत एक एप्रिल कामदा एकादस रोजी गायमुखापर्यंत पोहोचले आहेत.
येथील डोंगराच्या पायथ्याशी गायमुख असून सजावट करून वाजत गाजत डोंगर वरती प्रवेश आज सर्वच फक्त करणार आहेत. व दक्षिण दरवाजा येते डोंगरावरचे पुजारी या मानाच्या शासनकाठीला पानविडा नारळ देऊन डोंगरावर स्वागत करणार आहेत.
त्यानंतर देवाचे दर्शन घेऊन सासनकाठी व भाविक बेळगावकरांची हक्काची जागा येथे पाच दिवस यात्रेकरिता राहणार आहेत. त्यानंतर रोज सायंकाळी देवाच्या पालखीच्या सोहळा म्हणजेच सविनय चा सोहळा या सोहळ्यात बेळगाव श्री देव दादा सासणकाठी सहभाग घेते पाच दिवसाचा जत्रेचा विधी अर्चा करून पाच तारीख हा मुख्य यात्रेचा दिवस मुख्य पालखी सायंकाळी पाच वाजता बाहेर पडणार आहे. श्री जोतिबा देवाची पालखी यमाई देवीला भेटण्यास करिता जाते .
त्यानंतर मुख्य सोहळा म्हणजेच चैत्र पौर्णिमा यात्रा 5 एप्रिल हा सोहळा संध्याकाळी संपन्न करून र्व भाविक आपल्या वापसीच्या प्रवासाला निघणार आहेत.