जुने बेळगाव येथील निराधार केंद्रामध्ये गेल्या तीन वर्षापासून आश्रय घेतलेले श्री सर्जेराव शितोळे वय 63 वर्षे यांचा अल्पशा आजाराने सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी आहे. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे. त्याकरिता त्यांची मुलगी आरती हिने समाजसेविका माधुरी जाधव यांच्याशी संपर्क साधला.
माधुरी जाधव यांनी क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली माधुरी जाधव यांनी पुढील अंतिम विधी सर्जेराव यांची कन्या हिला करण्यास सांगितले व मुलगा आणि मुलगी यात फरक न करता आपले जे कर्तव्य आहे ते आपण पूर्ण केले पाहिजे असे त्यांनी सांगून वडिलांच्या देहाला अग्नी देण्यास सांगितले. आरतीने सहकार्य केल्याबद्दल माधुरी जाधव यांचे आभार मानले या कार्याकरिता रुग्णवाहिका चालक मंजुनाथ लमानी आणि शंकर कोलकार यांनी सहकार्य केले.