अधिवक्ता परिषद स्थापना दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना फळ्यांची भेट
बेळगाव :
अधिवक्ता परिषद कर्नाटक, बेळगाव शाखेच्यावतीने ८ सप्टेंबर २०२५ रोजी स्थापना दिन साजरा करण्यात आला. या औचित्याने सामाजिक बांधिलकी जोपासत अधिवक्ता सचिन आर. शिवन्नावर यांनी समर्थ नगर येथील सरकारी कनिष्ठ प्राथमिक कन्नड शाळेला फळा (ग्रीन बोर्ड) भेट दिला.
या उपक्रमावेळी अधिवक्ता सदाशिव हिरेमठ, अधिवक्ता जयश्री मंद्रोळी, अधिवक्ता चित्रा गौंदळकर, अधिवक्ता प्रीमा, अधिवक्ता दीपक नवरक्की व अधिवक्ता आर. एल. पाटील यांची उपस्थिती होती.
शाळेचे मुख्याध्यापक असीफ यू. नेसर्गी, सहाय्यक शिक्षिका सौ. गीता शाम वाळीशेट्टी, तसेच सौ. भाग्यश्री बी. अडनगी (स्वयंपाकघर कर्मचारी) यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या दानशूर कार्यामुळे शाळेच्या अध्यापन प्रक्रियेस चालना मिळणार असून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.