स्वखर्चातून मोफत पाणीपुरवठा
शहरात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याकरिता इतरत्र भटकावे लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने विहिरी बोरवेल आधी सुकून गेले आहेत.
त्यामुळे पाणी वापरण्याकरिता मोठी अडचण येत आहेत. ही समस्या जाणून घेऊन कॅम्प येथील अरफात धारवाडकर यांनी स्वखर्चातून गेल्या महिन्याभरापासून टँकर ने नागरिकांना पाणीपुरवठा करत आहेत.
सध्या नागरिकांना वापरण्याचे पाणी ते टॅंकरने पुरवठा करत असल्याने नागरिकांची दैनंदिन कामे सुरळीत चालली आहेत. मात्र कॅन्टोन्मेंट ने पाणीपुरवठा करण्यासाठी कॅम्प भागातील नागरिकांकडे दुर्लक्ष केला असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
कॅन्टोन्मेंट परिसरात कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे पाणी पुरवठा करण्याची सुविधा आहे मात्र त्याकडे कॅन्टोन्मेंट अक्षयम दुर्लक्ष करत असून त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे.
ती समस्या जाणून घेऊन अरफात धारवाडकर यांनी गेल्या महिन्याभरापासून निधी नागरिकांना पाणीपुरवठा करत आहे कसे आज पासून ते नागरिकांना पिण्याचे पाणी देखील उपलब्ध करून देणार असल्याची काही त्यांनी डी मीडियाला दिली आहे.