चव्हाट गल्ली येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न
डॉ रवी पाटील हे कोरोना काळात बेळगाव परिसरातील रुग्णांची सेवा निःस्वार्थीपणे व निडरपणे केली. या काळात रुग्ण व डॉक्टर असा भेदभाव न ठेवता आरोग्यसेवा खुप छान दिली. ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्यामध्ये डॉ. रवी पाटील यांना खूपच धन्यता वाटते. त्यांच्या सेवेतच खरा आनंद व परमार्थ मिळतो, असे प्रतिपादन बेळगावचा राजा गणेशोत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील जाधव यांनी डॉ रवी पाटील यांच्या बद्दल उपस्थितांना उद्घाटनप्रसंगी माहिती सांगितले.
विजया ऑर्थो अँड ट्रुम सेंटर हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. रवी पाटील व बेळगावचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव तर्फे संयुक्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शनिवारी सकाळी 6 ते 9 पर्यंत केले होते.
चव्हाट गल्ली परिसरातील जवळपास 200 हुन अधिक गल्लीतील व परिसरातील नागरीकाने लाभ घेतला. यावेळी गणेश मंडळाचे सचिव व वैद्यकीय कक्ष समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकरांच्या कडून सर्व नागरिकांना ज्युस देण्यात आला.
शिबिरात हृदयरोग, नेत्ररोग, हाडाचे विकार, जनरल तपासण्या, शुगर, ईसीजी आदी तपासण्या मोफत केल्या. विविध रोगांवर उपचार आणि मार्गदर्शन झाले. यामध्ये
विजया ऑर्थो अँड ट्रुम सेंटर हॉस्पिटलचे डॉ उमेश शिंदोळकरसह अन्य डॉक्टरांनी सहभाग घेतला. मणका, मान, कंबर व पाठदुखी तसेच हाडांच्या समस्येवर ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपीसह आयुर्वेदिक, हर्बल कायरोप्रॅक्टिक उपचारांबाबत उद्बोधन झाले.
आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी आनंद आपटेकर, सुनील जाधव,निशा कुडे, श्रीनाथ पवार, विनायक पवार जयवंत काकतिकर, यांनी केले.