*शिवसेनेच्या वतीने बडस येथे मोफत आरोग्य शिबीर*
हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने लोक कल्याण मोफत आरोग्य शिबीर सुरु करण्यात आले होते. हे आरोग्य शिबीर बेळगावसह खानापूर मधिल जवळपास सत्तरहून अधिक गावात राबविण्यात आले. पहिल्या टप्प्यातील आरोग्य शिबिराची सांगता आज इनाम बडस ता.बेळगाव या गावात राबविण्यात आलेल्या शिबिराने झाली, यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी या शिबिरा विषयी माहिती दिली व हे शिबीर दरवर्षी सीमाभागात राबविण्यात येत असून जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
तर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी या मोफत शिबिराचा सीमाभागातील नागरिकांना फायदा होत असून वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करताना आशा बहुउपयोगी उपक्रम शिवसेनाच्या वतीने राबविण्यात येते,असे मनोगत व्यक्त केले. कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना शिवसेनेने नेहमीच लोकोपयोगी व सामाजिक स्तरावरची बांधिलकी कायम जपली असून आजही ती कार्यरत ठेवली आहे असे सांगून या उपक्रमात आम्ही सहभागी आहोत याचे भाग्य आम्हाला मिळाले व शिवसेनेसोबत आम्हीही कार्यरत राहू असे आश्वासन दिले. या शिबिरात नेत्र तपासणीसह, रक्तदाब व इतर आरोग्यविषयक गोष्टींची मोफत तपासणी करण्यात आली.
यावेळी सरचिटणीस मनोहर हुंदरे, डॉ. रविंद्र चव्हाण,डॉ. शरद चव्हाण,डॉ.शिवम भोसले, डॉ. मयुर मोरे, रमेश माळवी, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मिनाजी सुतार,ग्राम पंचायत सदस्या रूपा सुतार, अनुराधा कांबळे, सदस्य विठ्ठल पाटील,सदस्य नारायण पाटील तसेच कल्लाप्पा पाटील,कृष्णा पाटील,ग्रामस्थ नागरिक व महिला उपस्थित होत्या. शंभरहून अधिक महिला पुरुषांनी या शिबिराचा लाभ घेतला.