सिलिंडरचा स्फोट होऊन चार जण गंभीर जखमी
शहरातील गांधीनगर येथील सुभाष गल्ली येथे आज सिलिंडरचा स्फोट होऊन चार जण गंभीर जखमी झाले. गांधीनगर मधील सुभाष गल्लीतील मंजुनाथ अथणी व त्यांची पत्नी लक्ष्मी गंभीर जखमी झाले असून त्यांची दोन मुलेही जखमी झाले आहेत .
त्यांना बेळगावच्या केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंजुनाथ अथणी हे बेळगाव येथील KSRTC येथे कार्यरत असून, आज सकाळी ड्युटीवर जात असताना त्यांनी चहा बनवण्यासाठी गॅसचा सिलिंडर लावण्यासाठी लायटर चालू केला असता सिलिंडरचा स्फोट झाला, त्यामुळे आग लागली आणि चार जण गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी बेळगावातील माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.