गल्फ मध्ये झालेल्या भीषण अपघातात बेळगाव जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू
गल्फ मधील ओमान येथे झालेल्या भीषण अपघातात बेळगाव जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला. कार आणि मालवाहू ट्रक यांची टक्कर झाल्याने हा अपघात घडला.अपघात झाल्यावर दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
अपघात झाल्यावर ट्रक आणि कारने पेट घेतला आणि त्या आगीत कारमधून प्रवास करणाऱ्या चौघांचे सजीव दहन झाले.अपघातातील चौघे मृत हे बेळगाव जिल्ह्यातील गोकाक गावातील एकाच कुटुंबातील आहेत. पवनकुमार तहसीलदार,पूजा, विजया आणि आदिषेश अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.हे चौघे जण पर्यटनासाठी गेले होते.अपघातात
दोन मुले ,आई आणि जावई अशा चौघांचा मृत्यू झाला आहे.त्यांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी हे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या संपर्कात आहेत.