ज्योती हत्तरपाठ (५०) आणि त्यांची मुलगी मेघा हत्तरपाठ ,महादेवी भावनूर रा.शिवाजीनगर आणि अरुण कोपर्डे रा.शेट्टी गल्ली अशी चेंगारा चेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.तीन दिवसांपूर्वी प्रयाग राजला साई रथ ट्रॅव्हल एजन्सी कडून भाविकांचा गट गेला होता.त्यामध्ये या चौघांचा समावेश होता.अरुण कोपर्डे यांची पत्नी कांचन कोपर्डे देखील त्यांच्या समवेत होती. ती देखील चेंगरा चेंगरीत जखमी झाली आहे.तिनेच बेळगावला आपल्या कुटुंबाशी संपर्क साधून पतीच्या मृत्यूची माहिती दिली.
बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी देखील बेळगावहून गेलेल्या भाविकांची माहिती घेण्यात येत असल्याचे सांगितले.जिल्हा प्रशासन तेथील जिल्हाधिकारी,अन्य अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.रेल्वेने आणि विमानाने प्रयाग राजला गेलेल्या भाविकांची माहिती मिळवण्यात येत आहे.बरेच जण वाहनाने गेले असल्याने त्यांची माहिती मिळवण्यात अडचण येत असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले