माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे निधन
भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास त्यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग हे दोन वेळा देशाचे पंतप्रधान होते. अनेक दिवसांपासून त्यांनी आजारी होते. यासाठी त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसरीकडे डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त कळताच संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
उद्या बेळगाव मधील होणारा गांधी भारत १०० कार्यक्रम रद्द
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने काँग्रेस सरकारच्या वतीने बेळगाव येथे घेणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे तसेच खासदार राहुल गांधी यांच्यासहित काँग्रेसचे दिग्गज नेते व कार्यकर्ते दिल्लीला रवाना झाले आहेत.