*सीमा प्रश्नासाठी महत्त्वाचे योगदान देणारे माजी महापौर ॲड. नागेश सातारी: प्राचार्य डॉ. आनंद मेणसे*
अमृत महोत्सव सोहळा, विशेष व्याख्यान आणि शिबिराचे आयोजन : मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन
बेळगाव, (तारीख 14 जून 2023 ): मराठी भाषा मराठी अस्मिता संस्कृती टिकवण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून मातृभाषेचे महत्व पटवत माय मराठीची सेवा करत आले आहेत. सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अनेक वर्षापासून भाग घेणारे आणि सर्व समस्यांचे निराकरण करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे निष्ठावंत कर्तबगार निस्वार्थ प्रामाणिक कार्य पार पडणारे समाजसेवक ॲड. नागेश सातेरी यांचे कार्य नव्या पिढींना प्रेरणा देणारे आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये सामाजिक राजकीय शिक्षण आरोग्य कला क्रीडा साहित्य सहकार मनोरंजन सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपला कर्तुत्वाचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय आहे. सर्वसामान्यांच्या न्याय आणि हक्कांसाठी कामगारांच्या प्रश्नासाठी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अथक परिश्रम घेऊन वेळोवेळी न्याय मिळवून दिलेला आहे. गोरगरिबांना सहकार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचित आहे. बेळगाव मध्ये अनेक असे नामवंत साहित्यिक कवी लेखक कलावंत राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या या व्यक्तिमत्त्वाचा ठसा समाजावर उमटलेला आहे. त्यांच्या कर्तुत्वाचा ठसा समाजावरती अधिराज्य गाजवत राहू शकतो कारण सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी वेळोवेळी गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेणारे हे व्यक्तिमत्व आहे. मराठी भाषा संस्कृती अस्मिता आणि बेळगाव सीमा भागातल्या सीमा प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून महत्त्वाचे योगदान दिलेले आहेत. अनेक वर्षापासून संपादकीय कार्यातून समाजात असणाऱ्या विषमता दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी वेळोवेळी केलेला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्यामध्ये त्यांचा अग्रणी सहभाग वेळोवेळी असतो तो सदा नव्या पिढीला प्रेरणा देत राहील. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक निवृत्त प्राचार्य आनंद मेनसे यांनी केले.
बेळगावचे माजी महापौर समितीचे ज्येष्ठ नेते कामगार नेते ज्येष्ठ कायदेतज्ञ सल्लागार आणि समाजसेवक, क्रीडापटू ॲड. नागेश सातेरी सरांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त अमृत महोत्सव समितीची बैठक मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता रामदेव गल्ली बापट गल्ली गिरीश कॉम्प्लेक्स च्या शहीद भगतसिंग सभागृहात नुकताच बैठक संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक निवृत्त प्राचार्य डॉ आनंद मेणसे उपस्थित होते.
प्रमुख उपस्थितीत फार असोसिएशनचे उपाध्यक्ष कायदेतज्ञ सल्लागार ॲड. सुधीर चव्हाण , प्रा दत्ता नाडगौडा , अनिल अजगावकर, ज्येष्ठ पत्रकार कृष्णा शहापूरकर , विलास अध्यापक, प्रा निलेश शिंदे, चंद्रकांत मजूकर, सुभाष कंग्राराळकर व्यासपीठावरती उपस्थित होते.
स्वागत संदीप मुतगेकर यांनी केले प्रास्ताविक कृष्णा शहापूरकर यांनी केले यावेळी मधु पाटील शिवलीला मिसाळे ॲड. सुधीचव्हाण , विलास अध्यापक, भरत गावडे अनिल अजगावकर यांनी विचार मांडले. सूत्रसंचालन भरत गावडे यांनी केले. आभार शेखर पाटील यांनी मांडले.
ॲड. नागेश सातेरी यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त विविध विशेष कार्यक्रम विशेष व्याख्यान शिबिर आणि गौरव सन्मान सोहळा रविवार दिनांक 18 जून 2023 रोजी दुपारी चार वाजता मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज खानापूर रोड बेळगाव येथे ॲड. नागेश सातेरी यांना 75 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त त्यांच्या अमृत महोत्सवी सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये प्रमुख सहभागी असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष कामगार नेते ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत कृष्णा मेनसे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख वक्ते व प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक लेखक कवी अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख विशेष उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून सीमा लढ्याचे अग्रणी नेते तरुण भारत वृत्तपत्राचे ज्येष्ठ संपादक विचारवंत किरण ठाकूर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते दीपक दळवी, ज्येष्ठ लेखक विचारवंत साहित्यिक कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. सिद्दंनगौडा पाटील, तसेच बेळगाव जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रभू यत्नट्टी, सत्कारमूर्ती ॲड. नागेश सातेरी यांच्या पत्नी कला सातेरी, अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य आनंद मेनसे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रभावती शहापूरकर, सईद मोकाशी, अनिल पाटील, पावशे , गोपाळ शहापूरकर, गायत्री गोणबारे, दीपिका जाधव, अर्जुन सांगावकर , महेश राऊत, निलेश खराडे , मनोहर सांबरेकर, असलमन खान , शामल तूडयेकर, खुर्शिदा शैलेशकर, साई पाटील, सी.ए.बिदणाळ, संजय सातेरी अशोक अलगोंडी, अजय सातेरी, आनंद कानविंदे, तसेच व्यवस्थापन कमिटीचे पदाधिकारी सदस्य विद्यार्थी पालक शिक्षक प्राध्यापक कर्मचारी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.