माजी आ.अनिल बेनकेंचा अजित दादांना पाठिंबा
महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते,राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार मध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रवादीतील बहुसंख्या आमदारांची साथ मिळाली आहे.
अजित दादांना साथ देणाऱ्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. या संदर्भात एबीपी माझाने दाखवलेल्या बातमीपत्रात भाजपचे बेळगावचे माजी आमदार अनिल बेनके यांची अजित दादांना साथ असल्याचे छायाचित्र सह दाखवण्यात आल्यामुळे बेळगावकर चक्रावले आहेत.