बेळगाव :तालुक्याच्या पूर्व भागातील मुतगा निलजी बसरीकट्टी सांबरा बाळेकुंद्री गावातील दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्याच्या उज्वल भविष्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम मंगळवार दि २१ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता न्यू इंग्लिश स्कुल मुतगे येथे होणार आहे.
आदर्शनगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनच्या वतीने प्रसिद्ध युवा व्याख्याते प्रा युवराज पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
अभ्यास कसा करावा यासोबतच आपले भावी आयुष्य कसे उज्वल करावे हे आपल्या ओघवत्या शैलीत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
तरी याचा लाभ परिसरातील जास्तीतजास्त विद्यार्थी पालकवर्ग तसेच शिक्षकवर्गाने घ्यावा असे आवाहन संजीवींनी फौंडेशनच्या संस्थापिका डॉ सविता देगीनाळ आणि सीईओ मदन बामणे यांनी केले आहे