चलवेनहट्टीत आगीत जनावरे जळून खाक
चलवेनहट्टी येथील गवत गंजीला आग लागून एक बैल एक म्हैश जळून खाक झाली असून शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळलं आहे उन्हाचा तडाखा इतका वाढला आहे की गेल्या महिन्या भरात आग लागण्याच्या घटनेत वाढ झाली असून बेक्कीनकरे येथे आग लागून तीन गवत गंज्या खाक झाल्याची घटना ताजी असताना चलवेनहट्टी येथील भावूक निंगाप्पा हुंदरे या शेतकऱ्यांच्या शेतातील गवत गंजीला आग लागून एक बैल तसेच एक म्हैस वा ज्वारीच्या दोन पोती जळल्याची घटना आज घडली शेतकऱ्यांना जनावरे शेतातील झोपडीत बांधली होती दुपारी तीनच्या दरम्यान गवत गंजीला आग लागली ऐनवेळी या ठिकाणी कोणीच नसल्याने जनावरे होरपळली आणी त्यातच त्याचा अतं झाला आती ही आग कोणी लावली आहे का अशी ही शंका येत आहे तरी या घटनेत जवळपास शेतकऱ्यांचे दोन लाखांचे नुकसान झाले आहे
रात्री उशिरा पंचनामा करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू होती