अपघातात मृत्यु पडलेल्या सर्वांना ५ लाख रुपयेची आर्थिक मदत करणार
भरधाव वेगाने जाणाऱ्या महिंद्रा पिकप वाहनाला अपघात झाल्याने सहा जण ठार तर सोळा जण जखमी झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील चिंचनूर येथे घडली आहे . सौंदत्ती यल्लमा देवीच्या दर्शनाला जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.
बुधवारी मध्यरात्री हा अपघात चिंचनूर येथील विठ्ठल मंदिराच्या जवळ घडला.भरधाव वाहनावरील चालकाचे नियंत्रण वळणावर सुटल्याने महिंद्रा पिकप जाऊन झाडाला आदळली. यामध्ये पाच जण जागीच ठार झाले तर एक जण इस्पितळात उपचार सुरू असताना मरण पावला.अपघातात जखमी झालेल्या सोळा जणांना गोकाक येथे हलविण्यात येत असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.जखमींच्या डोक्याला मार लागला असून काही जणांचे हात,पाय मोडले आहेत. जखमींची तब्येत स्थिर आहे.वाहन चालकाची पत्नी आणि मुलगी देखील अपघातात जखमी झाले आहेत.अपघाताची नोंद कटकोळ पोलीस स्थानकात झाली असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख डॉ.संजीव पाटील यांनी दिली.अपघातातील मृत व्यक्ती रामदुर्ग तालुक्यातील हुलकुंद गावचे आहेत.
बेळगाव येथील रामदुर्ग तालुक्याच्या कटकोळ पोलीस ठाण्यांतर्गत चिंचनूरजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा जिल्हा प्रभारी मंत्री गोविंद कारजोळ यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी भरपाई देण्याचे मान्य केले आहे.
अपघातात जखमी झालेल्याना प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा आयुक्त व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना यापूर्वीच कळविण्यात आले आहे