बेळगांव:बेळवट्टी येथील रोहिणी रामलिंग चौगुले या तरुणीचा काही दिवसांपूर्वी झालेल्या कार- दुचाकी धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या रोहिणीला तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच तिने प्राण सोडले.
या भीषण अपघातात रोहिणीची आई आणि मामा देखील जखमी झाले होते. सध्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू असून मामाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. चिमुकल्या वयात रोहिणीचा झालेला अपघात मृत्यू गावात शोककळा पसरवून गेला आहे.
या दु:खद प्रसंगी मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी स्वतः चौगुले कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि सांत्वन व्यक्त केले. तसेच लक्ष्मीताई हेब्बाळकर फाऊंडेशन तर्फे कुटुंबाला आर्थिक मदत करून दिलासा देण्यात आला.
गावकऱ्यांनी या दुर्घटनेला “जीवनाच्या स्वप्नांना लागलेला अघटित धक्का” असे संबोधून चौगुले कुटुंबाला धीर दिला आहे.