अखेर सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब
कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची आता उत्सुकता संपली आहे. काँग्रेसचे कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या होणार यावर सध्या शिक्कामोर्तब झाले आहे तर उपमुख्यमंत्री पद हे डी के शिवकुमार यांच्याकडे असणार आहे.
13 मे रोजी कर्नाटकाच्या निवडणुकीनंतर निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष बहुमताने विजयी झाले.त्यानंतर मुख्यमंत्रीपद हे कोणाकडे असणार याबद्दल अनेकांमध्ये प्रश्न निर्माण झाले होते.
मात्र आता चार दिवसानंतर विजयाची घोषणा झाल्यानंतर अनेक सूत्र हलविण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री पद हे सिद्धरामय्यांकडे असणार अशी माहिती पुढे आली आहे.तसेच सिद्धरामय्या हे उद्या शपथ घेण्याची शक्यता आहे.