बेळगाव:ॲपटेक एव्हिएशन आणि हॉस्पिटलिटी अकॅडमी मध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची निवड राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट हैदराबाद येथे झाली आहे.
आज ॲपटेक एव्हिएशनच्या सभागृहामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोटिवेशनल कोच आणि बिझनेस अनॅलिस्टिक राज कणेरी हे उपस्थित होते यांच्या हस्ते राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट हैदराबाद येथे मुफासीला मोमीन व मलिक यरगुड्री यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी ॲपटेक एव्हिएशनची व्यावसायिक भागीदार विनोद बामणे सरस्वती इन्फोटेकच्या एमडी ज्योती बामणे तसेच पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.