विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी छेडले आंदोलन
स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जावा त्याचबरोबर वीज दरवाढ रद्द करावी अशी मागणी आज कर्नाटक रयत संघ आणि हसीरू सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी कर्नाटक रयत संघ आणि हसिरू सेने यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत योजना सादर केले. कन्नड साहित्य भवन येथून त्यांनी निषेध मोर्चा काढला आणि आपली मागणी पूर्ण व्हावी अशी मागणी केली.
यावेळी शेतकऱ्यांनी निदर्शने करत आपली मागणी पूर्ण व्हावी याकरिता आंदोलन केले सरकार कोणतेही असो आम्ही गेली काही वर्षे नुकसान भरपाईसाठी सतत आंदोलन करत आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या हानीची नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही यंदा आता महिना होत आला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा.तसेच सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई च्या माध्यमातून दिलासा द्यावा अशी मागणी केली.
तसेच सध्याचे दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन बँक आणि सोसायटींकडून केली जाणारी कर्जवसुली थांबविण्यात यावी आणि वीजदर वाढ तात्काळ रद्द करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.
याप्रसंगी निवेदन सादर करतेवेळी कर्नाटक राज्य रयत संघ हसिरुसेनेचे पदाधिकारी सदस्य तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.