शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी हुतात्मा दिन केला साजरा
यद्ये कर्नाटक तसेच प्रगती पर संघटना आणि भारतीय कृषी समाज तसेच संयुक्त होराट कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने आज नरगुंद नवलगुंद आंदोलनात बलिदान दिलेल्या शेतकऱ्यांच्या 43 व्या हुतात्मादिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सकाळी हा कार्यक्रम कन्नड साहित्य भवन येथे गांभीर्याने पार पाडण्यात आला.
यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते झाडाच्या रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करा हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांबद्दल माहिती दिली.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी के एस तालुका अध्यक्ष संजय डोंगरराव हे होते तसेच व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ए आय टी यु सी चे नेते माजी महापौर एडवोकेट नागेश सातेरी तसेच जमात इस्लामचे नेते मकानदार अशोक चंद्रगी दुर्गेश मेत्री स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या शिवलीला मिसाळे यांच्यासह अन्य व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली कालापर यांनी केले तर आभार सतीश पाटील यांनी मानले.