शेतकरी नेत्याला तिन्ही पक्षांनी पाठिंबा द्यावा
तिन्ही पक्षांनी शेतकरी नेत्याला द्यावी उमेदवारी अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेनेचे शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली.शहरातील कन्नड साहित्य भवन मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि मागणी केली.यावेळी ते म्हणाले की सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांवर अन्याय करून त्यांची परिस्थिती धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
मेळुकोटमध्ये पुट्टनय्या यांच्या मुलाला काँग्रेसने तिकीट दिले आहे. तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यालाही तिकीट द्यावे, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडे त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मूळ शेतकरी असलेला व्यक्ती सदनात जाणे आवश्यक आहे. त्यामुळे रयत संघटनेने शेतकरी नेत्याला उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आग्रह करूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशनात चर्चा होऊ शकली नाही, यावरून हे स्पष्ट होते. शेतकरी स्वामिनाथन अहवालाची अंमलबजावणी करण्यात राजकीय पक्ष पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेनेचे शेतकरी उपस्थित होते.