*मराठा मंदिर तर्फे विद्यार्थ्यांसाठी सुविधा*
बेळगाव -मराठा मंदिर ट्रस्ट या संस्थेच्या वतीने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासिका सुरू करण्यात येत आहे ही एक सुवर्णसंधी असून विद्यार्थ्यांना शांत आणि अभ्यासपूर्वक वातावरण याबरोबरच आवश्यक साहित्य सुविधा आणि मार्गदर्शन मिळणार आहे.
विविध उच्च आणि स्पर्धात्मक परीक्षांना समाजातील विद्यार्थी सामोरे जावेत यासाठी विद्यार्थ्यांना इंटरनेट, वाय-फाय फॅसिलिटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठा मंदिर संस्थेशी ०८३१ २४२८९०७ या फोन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मराठा मंदिर चे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांनी केले आहे.