हडलगा येथे बस फेरी सुरू करावी याचे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडून खानापूर डेपो मॅनेजरना आज निवेदन देण्यात आले.
हडलगा ता.खानापूर येथील विद्यार्थी विद्यार्थिनींनी काल एक व्हिडिओ प्रसारित करून सरकारी बसची मागणी केली होती, याची दखल खानापूर म.ए. समिती व युवा समिती खानापूर यांनी घेत आज खानापूर बसडेपो मॅनेजर श्री महेश तिरकन्नवर यांची भेट भेट घेतली व उपलब्ध करून देण्याची मागणी केली, मॅनेजर तिरकन्नवर यांनी त्या भागाचा सर्वे करून बस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी खानापूर समितीचे अध्यक्ष श्री सूर्याजी पाटील,युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील,माजी तालुका सभापती सुरेश देसाई,लक्केबैल पिकेपीएस चे माजी अध्यक्ष रवी पाटील व राजू पाटील उपस्थित होते.