This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2023
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*राजशेखर वीरप्पा पाटील यांचे नेत्र, त्वचा आणि शरीर दान*


राजशेखर वीरप्पा पाटील यांचे नेत्र, त्वचा आणि शरीर दान

राजशेखर वीरप्पा पाटील (९०) यांचे आज निधन झाले, त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी नेत्र, त्वचा व शरीर दान बैलहोंगल येथील डॉ. रामण्णवर चॅरिटेबल ट्रस्ट ला करण्यात आले .त्यांचे नेत्र केएलई रुग्णालयाच्या नेत्रपेढीला दान करण्यात आले या दात्यामार्फत दोन अंध व्यक्तींना नेत्रदृष्टी भेट मिळाली आहे.

तसेच त्यांची त्वचा बेळगाव केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल रोटरी स्किन बँक त्वचा जळलेल्या रूग्णांसाठी केला जाणार आहे. तसेच त्यांचे शरीरवैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीरशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी काहेरच्या श्री बीएमके आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आले आहे .

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास कुमार शेट्टी, नेत्रपेढीचे समन्वयक डॉ. शिवानंद बुबनाळे, स्किन बँकेचे समन्वयक डॉ. राजेश पवार, प्राध्यापक व शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. महांतेश रामण्णवर यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी देहदान केल्याबद्दल पाटील कुटुंबीयांचे मनापासून आभार मानले.दात्याच्या पश्चात पत्नी प्रभावती, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply