एव्हिएशन क्षेत्रातील विविध मॉडेल्सचे प्रदर्शन
अपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटलिटी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आज विविध मॉडेल्स प्रदर्शनाकरिता मांडले होते यामध्ये त्यांनी न्यू मोपा गोवा एअरपोर्ट, छत्रपती शिवाजी एअर टर्मिनल्स ,777 बोईंग प्लेन तसेच एअरबस मॉडेल प्रदर्शनाकरिता मांडले होते.
यावेळी प्रदर्शन पाहण्याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन बसवराज आणि बेळगाव एव्हिएशनसी कुमार स्वामी उपस्थित होते यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल बद्दल कौतुक केले आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी हुबेहूब अशा एअरपोर्ट संबंधी मॉडेल्स तयार केले होते यावेळी मॉडेल्सची पाहणी करून आलेल्या पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले.
प्रारंभी या कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी घालून करण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना बेळगाव फ्लाईंग स्कूलचे इन्स्ट्रक्टर कॅप्टन बसवराज यांनी आपटेक विद्यार्थ्यांना उंच भरारी घेण्याकरिता जी संधी देत आहे त्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेण्याचे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांना केले.
त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेत असलेल्या प्रशिक्षणामुळेच त्यांनाही मॉडेल्स करता शक्य असल्याचे प्रतिपादन केले यावेळी या कार्यक्रमाला अपटेकचे विद्यार्थी उपस्थित होते