अंतरराष्ट्रीय सूत्रांचे राजस्थान येथे कर्नाटक कला आणि संस्कृती चे प्रदर्शन
राजस्थान येथील सी सी आर टी सेंटर उदयपूर येथे पंधरा दिवसाची भारतीय संस्कृती आणि संशोधन कार्यशाळे अंतर्गत 14(चौदा)राज्यातील विविध शालेय शिक्षकांची निवड या कार्य शाळेसाठी करण्यात आली यामध्ये कर्नाटक मधून खानापूर तालुक्यातील ,सौ.माधुरी वीर,सौ.सुदीपा हंडे, रामदूर्ग तालुक्यात सौ अश्विनी कोळी,सवद्ती तालुक्यातून सौ ललिता व सौ.नागरत्ना मडीवाळर,विजापूर मधून संगमेश जगमरोट्टी, महांतेश हावरगी,दुंड्डाप्पा हरिजन,शिवयोगी पट्टणशेट्टी,विरेश नवली या शिक्षकांचा समावेश होतो
या कार्यशाळेत कर्नाटक राज्याची संस्कृती, येथील विविध जानपदे,ग्रामीण कला,सीमा प्रदेश, कन्नड मराठी ऐक्य ,प्रसिध्द व्यक्ति ,विद्यापीठे,ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ति,
बसवण्णा,अक्कमहादेवी,कित्तुर राणी चन्नमा,ओब्बवा,यांच्या वेशभूषा आणि विचार सादर करण्यात आले ,यावेळी राज्यातील प्रसिद्ध गीते,नाडू गीत, सच्चे कन्नड दीपा,हुट्टीदरे कन्नड हागे हुट्ट बेक्,भाग्यद बळीगार,आदी गीतांचे सादरीकरण करण्यात आले ,सीमा भागातील मराठी संस्कृतीच्या प्रभावात होणारे लग्न समारंभ, हाळदी,कार्यक्रमाची गीते,अंगाई,बारसे,गीते प्रदर्शीत करण्यात आले.
यावेळी सर्व राज्यतील शिक्षकांनी सामूहिक गीते गाऊन कर्नाटक संस्कृतीचा पूर्ण आस्वाद घेतला.