बेळगाव – खानापुर , तारीख 02 डिसेंबर 2024 : जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडून आणले गेले पाहिजे; संघर्ष, जिद्द चिकाटी मेहनत , कार्यात सातत्य कायम ठेवल्यास कोणतेही ध्येय गाठण्यासाठी वेळ लागणार नाही. प्रामाणिक खडतर प्रयत्न करून नीचित ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम घ्यायला हवे. विविध क्षेत्रात स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. त्यात शैक्षणिक क्षेत्र म्हटल की स्पर्धेसाठी जणू रसिकेच लागलेली असते. अभ्यासामध्ये दिवसरात्र एक करून ,अनेक विद्यार्थी आपले नशीब आजमावतात . पण यशस्वी तोच होतो जो योग्य मार्गदर्शन ,अचुक नियोजन, व आपल्या कार्यात सातत्य ठेवतो. निच्छित ध्येय गाठण्यासाठी अचूक नियोजन हवे. वाचन माणसाला जीवनात डोळसपणा निर्माण करते. ज्ञान माणसाला परिपक्व बनवण्यास मदत करते. विद्यार्थ्यासह मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन महत्त्वाची भूमिका निभावते. एक समाज सुदृढ समाज निर्माण निर्मितीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. प्रत्येकाने एक चांगला माणूस होण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. दुर्गम भागातील शाळा आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी समाजाने प्रयत्न करून सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे. असे प्रतिपादन प्रमुख वक्ते समाजसेवक श्री. मंजुनाथ सिंदिगार यांनी “” स्पर्धात्मक युगात यशस्वी वाटचाल एक गुरुकिल्ली”” या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते.
D Media 24 > Local News > *सुदृढ समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा : वक्ते समाजसेवक श्री. मंजुनाथ सिंदिगार* बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आदेशानुसार कालमनी शाळेला भेट आणि : सिद्धेश्वर फाउंडेशन, माजी विद्यार्थी संघटना - सरकारी मराठी शाळा आणि ग्रामस्थ यांच्यावतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन
*सुदृढ समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा : वक्ते समाजसेवक श्री. मंजुनाथ सिंदिगार* बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आदेशानुसार कालमनी शाळेला भेट आणि : सिद्धेश्वर फाउंडेशन, माजी विद्यार्थी संघटना - सरकारी मराठी शाळा आणि ग्रामस्थ यांच्यावतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन
Deepak Sutar04/12/2024
posted on
Leave a reply