*नंदादीप नेत्रालय मधे माजी सैनिकांसाठी ECHS सेवेचा शुभारंभ*
बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटना महासंघातर्फे नंदादीप हॉस्पिटल बेळगाव शाखेमध्ये सर्व माजी सैनिकांना मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचा लाभ १०० हून अधिक लाभार्थ्यांनी घेतला.
या शिबिरामध्ये नंदादीप नेत्रालयाच्या बेळगाव शाखेमध्ये माजी सैनिकांसाठी ECHS सेवेचा शुभारंभ देखील करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सुरुवात जीवनविद्या मिशन च्या विश्व प्रार्थना तसेच राष्ट्रगीताने करण्यात आला. शिबिरामध्ये सहभागी सर्व माजी सैनिक व वीर पत्नींची मोफत नेत्र तपासणी व सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री. जगदीश पुजारी, जनरल सेक्रेटरी श्री. शिवबासप्पा काडनावर, श्री. भीमसेन तेनगी, श्री. गणपती देसाई, महिला अध्यक्ष श्रीमती सुनीता पट्टनशेट्टी यांनी सहभाग व त्यांचे मनोगत नोंदवले.
नंदादीप नेत्रालय मार्फत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आनंद तुप्पद यांच्या मार्फत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या कार्याध्यक्ष मेडिकल डायरेक्टर व मुख्य नेत्रतज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना पाटील यांच्या मार्फत हा सेवेचा लाभ सर्व माजी सैनिक व त्यांच्या परिवाराने जास्तीत जास्त घ्यावा याची विनंती करण्यात आली.
कार्यक्रमास नंदादीप नेत्रालयाच्या बेळगाव शाखेचे व्यवस्थापक श्री. इरया मस्तमार्डी, कार्यकारी व्यवस्थापक श्री. अनिरुध्द सूर्यवंशी, OT इन्चार्ज श्री. आनंद तुप्पाद व सर्व स्टाफ ची उपस्थिती होती.