1 जून पासून वीज दरवाढीचा ग्राहकांना झटका
काँग्रेसने केलेली प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा खोटी ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत,कारण जून महिन्यानंतर चक्क वीज दर वाढीचा झटका ग्राहकांना बसणार आहे.
कर्नाटकात काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा काँग्रेसने आपल्या जाहीरनामात केली होती,मात्र आता ही घोषणा फक्त आश्वासनात पुरतीच राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
अनेक ठिकाणी वीज बिल वसूल अधिकाऱ्यांशी नागरिक कुज्जत घालताना दिसत आहेत. एक जून पासून वीज दरवाढ लागू होणार असून हेस्कॉम आधी वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आर्थिक नुकसान सोसावे लागणार असल्याने त्यांनी आधीच दर वाढवून देण्याची मागणी केली होती. प्रति युनिट वाढल्या जाणाऱ्या दराबाबत 14 ते 28 फेब्रुवारी पर्यंत ग्राहकांकडून आक्षेप मागून घेतले होते.
त्यानुसार वीज कंपन्याने केलेल्या मागणीनुसार केईआरसी ने सुधारित वीज दर लागू करण्याची परवानगी दिली आहे.यानुसार एक जून पासून नवीन दर लागू होणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे हे आश्वासन आश्वासनच राहणार की 200 युनिट पर्यंत सर्वांना वीज मोफत मिळणार हे पाहावे लागणार आहे.