This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड

 

महानगरपालिकेवर निवडून आलेल्या भाजप नगरसेवकांची आज बैठक आज दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी बोलावली होती .

यावेळी बैठकीत जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महापौर उपमहापौराची निवडणूक होईल यासंदर्भात बैठक घेऊन चर्चा करण्यात आली.

तसेच भारतीय जनता पक्षाचा झेंडा मनपावर फडकेल अशी माहिती यावेळी आमदार अभय पाटील यांनी दिली.

 

त्याआधी आमदारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की कलबुर्गी धारवाड हुबळी बेळगाव येथील महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या परंतु ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर अडचणीमुळे महापौर उपमहारापरची निवड होऊ शकली नव्हती.

हुबळी धारवाड मनपाच्या महापूर उपमहापौरची निवड होऊन दोन महिने झाले पण बेळगाव महापौर उपमहापौरची निवड अद्याप झालेले नाही याबाबत मुख्यमंत्र्यांची बातचीत करण्यात आली आहे.

आता कायदेशीर अडचण दूर झाले असल्याने अधिकाऱ्यांनी सांगितले आहे त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल असा विश्वास त्यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केला.

यावेळी या बैठकीस उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्यासह भाजपचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24