रायबाग (बेळगाव), प्रतिनिधी –
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मुगळखोड क्रॉस येथील आदर्श बार अँड रेस्टॉरंटमध्ये जमावाने धुडगुस घालून तोडफोड केली व कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. या कारणावरून तब्बल आठ जणांच्या गटाने बारमध्ये घुसून फर्निचर, साहित्याची तोडफोड केली. त्यानंतर संतप्त जमावाने तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.