D Media 24 > Local News > *समाजाच्या क्रांतिकारी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील* पालकमंत्री सतीश जारकीहोळी, विविध संस्थांच्या वतीने सत्कार
*समाजाच्या क्रांतिकारी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील* पालकमंत्री सतीश जारकीहोळी, विविध संस्थांच्या वतीने सत्कार
Deepak Sutar24/03/2025
posted on


बेळगाव, तारीख 24 मार्च 2025 :
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कार्य करत राहू. सर्वसामान्य जनतेला सर्वाधिक आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रयत्न करणार असून जिल्ह्यातील अपुऱ्या वैद्यकीय सेवेबाबत मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा सुरू आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे. यासाठी बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील तालुक्यामध्ये पाणीटंचाई संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी आरोग्य व शिक्षण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर भर दिला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण विभागात आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी नियोजन सुरू आहे. रिक्त कर्मचाऱ्याबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेण्यात येईल. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन क्रांतिकारी बदल घडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि जनतेपर्यंत चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. *असे प्रतिपादन बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री सतीश जारकीहोळी यांनी केले.*
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक डॉ. गजानन वरपे होते.
अखिल भारतीय प्रगतिशील एल्गार सामाजिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था बेळगाव, श्री स्वामी विवेकानंद सामाजिक साहित्य परिषद बेळगाव, दीपज्योती फाउंडेशन बेळगाव, जे.के फाउंडेशन बेळगाव, अभिजात मराठी भाषा संवर्धन सामाजिक साहित्य परिषद बेळगाव आणि बेळगाव जिल्हा विश्वकर्मा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन नुकताच करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून सुरुवात झाली. दीप प्रज्वलन परिषदचे अध्यक्ष श्रीधर पाटील, माझी एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, माजी नगरसेवक अनिल पाटील, यल्लाप्पा पाटील, केपीसीसी सदस्य व बेळगावचे पालकमंत्री यांचे आप्तसहाय्यक समाजसेवक मलगौडा पाटील, खासदार प्रियंका जारकीहोळी आप्तसहाय्यक ए. बी. काजी, अरविंद कार्ची, प्रा. निलेश शिंदे, महेश बोरगाव, विनायक पाटील या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली. याप्रसंगी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला; यासह बेळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विनायक पाटील, गजानन मादार, विनायक लोहार, श्रुती पाटील, लक्ष्मी पाटील, वैशाली शिंदे, प्रथमेश सावंत, जे. के. जाधव, आष्टे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष बाळू कुरबर, बेळगाव जिल्हा कार्याध्यक्ष बाळू दासणट्टी, प्रा आर.एम. मोहीते, सरीता कावळे, भारती लोहार, कर्नाटक राज्य एस सी कमिटीचे कार्याध्यक्ष मंजुनाथ सिंदीगार, हरीश मेत्री, मंजुनाथ कांबळे, शिवा नाईक, आपय्या आष्टगी, नारायण पाटील, प्रा विशाल करंबळकर, पिंटू पाटील यासह बेळगाव जिल्ह्यातील वेगळ्या संस्थांचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. https://dmedia24.com/cancer-awareness-and-inspection-camp/
स्वागत मारुती बडीगेर यांनी केले. प्रास्ताविक विश्वकर्मा समाजाचे अध्यक्ष व श्रीलक्ष्मी इंजिनिअरिंग KEB गव्हर्नमेंट कॉन्ट्रक्टर मुरली बडिगेर त्यांनी केले. परिचय शशिकांत धामनेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा निलेश शिंदे यांनी केले. आभार लक्ष्मण गौंडवाडकर यांनी मानले.
Leave a reply