विद्यार्थिनींनी बनविल्या पर्यावरण पूरक राखी
शिक्षकाने प्रवृत्त केले असल्याने आज एक युवती पर्यावरण पूरक राख्या तयार करत आहे तसेच याला राख्या सध्या लोकप्रिय होत असून रक्षाबंधन सनादरम्यान भावांना वृक्षारोपण करून परिसरात हिरवाई आणण्यास प्रोत्साहित करत आहे.
गोगटे अभियांत्रिकी महाविद्यालयातील शेवटच्या वर्षात शिकणारी विद्यार्थीनी योशिता असे इको फ्रेंडली राख्या बनविणाऱ्या युवतीचे नाव असून ती सध्या युनिक्स बाय योशिता या नावाखाली राख्या बनवित आहे.
योशिताने हॅम्पर्स अर्थात बियान राखीचा करंडा निर्मितीमध्ये यश मिळवले आहे. तसेच 2021 पासून तिने ही संकल्पना रुजवली असून ती एक राखी 175 रुपयांना विकत आहे.
2021 पासून तिने ऑनलाईन पद्धतीने आपल्या राख्यांचा व्यवसाय पुढे आणला असून आतापर्यंत तीनशेहून अधिक ऑर्डर तिला मिळाले आहेत तसेच 45 ते 150 रुपये किमतीपर्यंतच्या आकर्षक पर्यावरण पूरक राख्या तिने बनविल्या आहेत.