बॅ. नाथ पै व्याख्यानमाला : रविवारचे व्याख्याते ज्ञानेश्वर महाराज बंडगर
बेळगाव-सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या ५० व्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प रविवार दि. १९-०१-२०२५ रोजी सायं. ५-३० वा. एसीपीआर सभागृह, गुरुदेव रानडे मंदिर, हिंदवाडी, बेळगाव येथे सांगोला येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर हे ‘संतविचार आणि समकाल’ या विषयावर गुंफणार आहेत. यानिमित्त त्यांचा परिचय-
ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर महाराज हे मुळचे सांगोला (सोलापूर) येथील असून त्यांची किर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून सर्वत्र ओळख आहे. त्यांनी विविध संतांविषयी लेखन केले आहे आणि संत साहित्यावर अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत. ते वै. भोजलिंग महाराज घेरडीकर महाराज यांचे नातू आहेत. यापूर्वी त्यांनी बेळगावात दिलेले व्याख्यान सर्वांना आवडलेले होते. रविवारच्या या व्याख्यानाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड, कार्यवाह सुनिता मोहिते व संचालक मंडळाने केले आहे.