ज्ञानयोग श्रमाचे सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या निधनामुळे शासकीय सुट्टी जाहीर
विजापूर जिल्ह्यातील ज्ञानयोग श्रमाचे सिद्धेश्वर स्वामीजी यांनी काल अखेरचा श्वास घेतला. काल दुपारी अचानक त्यांची प्रकृती खालावली तसेच त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. यावेळी त्यांनी काल रात्री अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाने संपूर्ण विजापूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या निधनाने संपूर्ण कर्नाटकात शोक व्यक्त करण्यात येत आहे..त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.