यांच्या प्रयत्नामुळे घंटागाडी नागरिकांच्या सेवेकरिता रुजू
वार्ड क्रमांक 33 व 34 मध्ये घंटागाडीची संख्या कमी असल्याने या भागात फक्त आठवड्यातून तीन वेळाच कचऱ्याची उचल होत होती. त्यामुळे ही समस्या जाणून घेऊन नागरिकांनी उपमहापौर रेश्मा पाटील यांना या भागात जादा घंटागाडी कचरा उचलण्यासाठी याव्यात अशी विनंती केली.
त्यानुसार आज येथील घंटागाडीची पूजा करून घंटागाडी नागरिकांच्या सेवेकरिता रुजू करण्यात आली. उपमहापौर रेश्मा पाटील यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून नवीन गाडी मंजूर करून दिली. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले. यावेळी उपमहापौर यांनी रस्त्यावर कचरा न टाकता घंटागाडीमध्येच कचरा टाकावा अशी विनंती केली.