बेळगाव: जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने काकती येथील शास्त्री रोड पहिला क्रॉस एक घर कोसळून मोठे नुकसान झाले आहे. शांता मल्लाप्पा सुरेकर कौलारू घर कोसळलेल्या मालकाचे नाव आहे.
शांता सुरेकर यांची परिस्थिती अत्यंत गरीब आहे आणि पावसाळ्यात घर कोसळल्याने सुरेखर कुटुंबीयांनी काकती ग्रामपंचायतकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
ग्रामपंचायत सदस्य गजानन गव्हाणे यांनी शास्त्री रोड पहिला क्रॉस इथे जाऊन कोसळल्या घराची पाहणी केली व नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.