बेळगांव: उत्तर मतदार संघाचे आ असिफ राजू शेठ यांनी मे महिन्यात महांतेश नगर परिसरातील अनेक समस्या संदर्भात पाहणी केली होती. व पावसाळ्यात रस्त्यावर तुंबणारे पाणी आणि पाण्यासंदर्भात विविध समस्यांचा संदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी त्यावेळी दिले होते.
तर आज आमदार असिफ शेख यांच्या अनुपस्थितीत त्यांचे सुपुत्र आमंत्रित यांनी स्थानिक नगरसेवक व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत खुसरोनगर मध्ये आमदार निधीतून मंजूर झालेल्या ड्रेनेजच्या कामाचे भूमिपूजन केले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमन सेठ म्हणाले की
बेळगावच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करायची आहेत.लवकर मान्सून येत असल्याने अशा प्रकारच्या कामांवर जलदगतीने लक्ष देण्याची गरज आहे. म्हणूनच माझ्या वडिलांच्या अनुपस्थितीत मला अधिकाऱ्यांसोबत यावे लागले. जेणेकरून रहिवाशांच्या समस्या लवकरच सोडविल्या जातील.यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असणार असल्याचे त्यांनी सांगितले.