विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाराच खरा शिक्षक- डॉ विष्णु कंग्राळकर
बेळगांव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणुन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मराठा मंडळ फार्मेसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु कंग्राळकर हे प्रमुख अतिथि म्हणुन उपस्थित होते. प्राचार्य डाँ.एच.जे.मोळेराखी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नेहा झांगरूचे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सांगुन उपस्थितांचे स्वागत केले.भारता चौगुले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ राधाकृष्णन यांच्या फोटो पूजना नंतर प्रमुख अतिथि डॉ विष्णु कंग्राळकर म्हणाले,विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोण प्रदान करून त्यांचा सर्वांगीण विकास करणाराच खरा शिक्षक असतो. विद्यार्थ्यांना योग्य संस्कार देऊन उत्तम नागरिक बणविण्याचे सामर्थ फक्त शिक्षकातच आहे.
अध्यक्षीय भाषणातुन बोलताना प्राचार्य डॉ .एच.जे.मोळेराखी म्हणाले की, शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचा योग्य सदुपयोग विद्यार्थ्यांनी केला तर शिक्षकाला खरा आनंद होतो. शिक्षकानी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यासाठी केला पाहिजे. यावेळी प्रा. आर.एम. तेली आणि प्रा. जी.एम. कर्की यांनी शिक्षक दिना विषयी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच काही विद्यार्थ्यांनी आपले शिक्षकाविषयी असलेले प्रेम आपल्या भाषणातून अभिव्यक्त केले. या कार्यक्रमाला डाँ. डी.एम.मुल्ला, डाँ.गिरीजाशंकर माने,प्रा.अर्चना भोसले,प्रा.भाग्यश्री चौगले आदी अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी पल्लवी यांनी सर्वांचे आभार मानले.