D Media 24 > Local News > *जैवविविधतेचे जतन व संवर्धन करणे गरजेचे : डॉ शिवाजी कगणीकर* *बेकिनकेरे शाळेचाच्या 220 विद्यार्थ्यांनी 1500 झाडे निर्माण करून झाडे लावण्याचा संकल्प : *""परिसर संवर्धन व जागृती अभियान - "
*जैवविविधतेचे जतन व संवर्धन करणे गरजेचे : डॉ शिवाजी कगणीकर* *बेकिनकेरे शाळेचाच्या 220 विद्यार्थ्यांनी 1500 झाडे निर्माण करून झाडे लावण्याचा संकल्प : *""परिसर संवर्धन व जागृती अभियान - "
Deepak Sutar05/04/2025
posted on


*जैवविविधतेचे जतन व संवर्धन करणे गरजेचे : डॉ शिवाजी कगणीकर*
*बेकिनकेरे शाळेचाच्या 220 विद्यार्थ्यांनी 1500 झाडे निर्माण करून झाडे लावण्याचा संकल्प : *””परिसर संवर्धन व जागृती अभियान – “
बेळगांव वृत्तसेवा
बेळगाव, तारीख 5 एप्रिल 2025 : जैवविविधतेचे जतन व संवर्धन करणे मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. यास्तव पृथ्वीचे देणे फेडण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी तुमची-आमची सर्वांची आहे, हे लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. ‘निसर्ग’ हे मानव, वन्यजीव, जलचर प्राणी, पक्षी अन् वनसंपत्ती यांना लाभलेलं मोठं वरदान आहे. या पार्श्वभूमीवर निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आधी आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करणं गरजेचं आहे. कारण, पर्यावरणाचा समतोल बिघडणे म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणं होय. सध्याच्या काळात जल, वायू व ध्वनिप्रदूषणामुले पृथ्वीचे स्वास्थ्य बिघडत चालले आहे. कारण, प्रदूषणामुळे पर्यावरणाचं नुकसान होत असल्याची जाणीव नसणं, हे बौद्धिक मागासलेपणाचे लक्षण आहे. पर्यावरणाच्या संवर्धनातून वसुंधरेचा बचाव करण्यासाठी जागतिक पातळीसह देशस्तरावर पर्यावरणवादी चळवळीची व्याप्ती वाढीस लागणे, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. पुढे जाऊन ती लोकचळवळ झाली, तर ते सर्व घटकांच्या दृष्टीने अधिक लाभदायक ठरेल, हे निश्चित.पृथ्वीवरील मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन व्हावे. बेळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये ईको क्लबच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि जागृती साठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत स्थानिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि वृक्षारोपण तसेच इतर उपक्रम पार पाडले. याच पद्धतीने विविध ठिकाणी पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे यावे *असे प्रतिपादन समाजसेवक डॉक्टर शिवाजीदादा कागणीकर यांनी केले.*
*सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा बेकिंनकेरे , इको क्लब बेळगांव, अखिल भारतीय प्रगतिशील एल्गार सामाजिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने *””परिसर संवर्धन व जागृती अभियान – “”झाडे लावा झाडे जगवा””* कार्यक्रम शुक्रवार दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी सकाळी शाळेच्या प्रांगणात मोठ्या थाटात कार्यक्रम संपन्न झाला.*
*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण संवर्धन चळवळीचे समाजसेवक डॉक्टर शिवाजीदादा कागणीकर उपस्थित होते.*
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या स्वागत गीत आणि ईशस्तवन गीत गायनाने करण्यात आले. व्यासपीठावरील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून एसडीएमसी चे अध्यक्ष प्रभाकर फडके, ग्रामपंचायत सदस्य रामा कुमरीकर, निवृत्त मुख्याध्यापक एन ओ. चौगुले, परिषदचे अध्यक्ष श्रीधर पाटील, पिडिओ स्मिता चंदर्गी यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाला चालना दिली.
दीप प्रज्वलन सदस्य मल्लापा सावंत, ग्रामपंचायत अध्यक्षा छबुताई कांबळे, ग्रामपंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी सावंत, नारायण पाटील, प्रा निलेश शिंदे, डॉ गजानन वरपे, मारुती बडीगेर, बाळू कुरबर, बाळू दासणट्टी, यल्लाप्पा पाटील, मंजुनाथ कांबळे, परशराम सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. फोटो पुजन सिद्धाप्पा राजगोळकर , दशरथ भोगण, बाळू गावडे, पूनम लोहार यांच्या हस्ते करण्यात आले; यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.
यावेळी 220 विद्यार्थ्यांनी 1500 प्लास्टिक पिशव्या घेऊन त्यामध्ये सेंद्रिय खत, गांडूळ खत, पालापाचोळा, गोवर, जैविक खत मिश्रण, पाणी इत्यादी घटक मातीत मिसळून प्लास्टिक पिशव्यामध्ये माती भरण्यात आली; यामध्ये जांभूळ, पेरू, चिकू, आंबा, कडुलिंब, चिंच, वड , लिंबू, काजू, सागवान, आकाशी, आवळा हिरडा बेहडा, हारडा, करंज्याचे झाड, फणस, पिंपळ, यासह विविध फळाफुलांची, औषधी वनस्पतींची झाडे निर्माण करण्यात येणार आहेत.
स्वागत सुनीता दुंडगेकर तर प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापिका वासंती लोखंडे यांनी केले. परिचय सुनीता पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन कांचन जाधव तर संजीवनी हावळे यांनी आभार मानले.
यावेळी अनिता सोनार, यल्लाप्पा पाटील, सरिता मांडलिक, अमोल सुतार, प्रा विशाला करंबळकर, प्रा शशीकांत धामणेकर, प्रा आर एम. मोहिते, गजानन मादार, प्रथमेश सावंत, प्रा. महादेव नार्वेकर यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी शिक्षक विद्यार्थी पालक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
https://youtube.com/shorts/2FolXAQV7KQ?si=0gBDnF_OvqKG6SpH
Leave a reply