डॉ बाबू जगजीवनराव यांची १८८ वी जयंती साजरी
बेळगाव: जिल्हा प्रशासन,जिल्हा पंचायत,समाज कल्याण विभाग,महानगरपालिकाच्या वतीने आज माजी उपप्रधानमंत्री डॉ बाबू जगजीवनराम यांची ११८ व्या जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयापासून शोभायात्रा काढण्यात आली. महानगरपालिका आयुक्त शोभा बी यांच्या हस्ते डॉ बाबू जगजीवन राम यांच्या प्रतिमेचे पूजन करून शोभयात्रेला चालना देण्यात आली. या यात्रेमध्ये ढोल ताशा आणि विविध वेशभूषा परिधान करून या शुभयात्रा डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, एस पी ऑफिस रोड करून कुमार गंधर्व हॉल येथे सांगता करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत महानगरपालिका व समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते .